हसनैन बागवानचा पहिला रोजा उत्साहात संपन्न

मंठा प्रतिनिधी:मंठा येथील हसनैन अब्दुलरहेमान बागवान (वय ८ वर्ष) यांनी बुधवार, दि. २५ रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पूर्ण केला. एवढ्या लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून हसनैनने ठेवलेला पहिला रोजा कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.हसनैन यांच्या या विशेष दिवसानिमित्त कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या आजी, आत्या, चुलते व चुलती यांनी शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले.या प्रसंगी नगरसेवक उबेद भाईजी, मोसीन कुरेशी, अब्दुल्ला बागवान, इम्रान मणियार, इस्माईल राज, तोफीक सय्यद, जावेद पिंजारी, मा. नगरसेवक इल्यास भाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी हसनैनचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments