मंठा येथील तळणी चौकीसमोर डिवायएसपीच्या राईटरकडून वाळू वाहतूकीच्यावाहनाची तपासणी

डिवायएसपीच्या राईटरकडून फोटो काढण्याऱ्या पत्रकारांना दमदाटी

मंठा येथील तळणी चौकीसमोर डिवायएसपीच्या राईटरकडून वाळू वाहतूकीच्यावाहनाची
तपासणी


मंठा प्रतिनिधी :मोसीन कुरेशी, परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने सोमवारी सकाळी ७ ते ९ या दरम्यान पूर्णा पाटी व तळणी चौकी समोर वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली . या कारवाईची दखल घेणाऱ्या पत्रकारांना फोटो काढण्यापासुन रोखत माहीती न देता दमदाटी करत पळ काढल्याने हे पथक बोगस तर नाही ना. असा प्रश्न निर्माण झाला आहे . पूर्णा नदीपात्रातून किर्ला व टाकळखोपा येथील वाळू पट्टयातून वाळूची वाहतूक सुरू आहे . या वाळू पट्टयावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी तळणी पोलिस चौकीसमोर सुरू होती. ही कारवाई डिवायएसपीचे राईटर रवी चव्हाण यांच्यासह चालक दुबळकर व तळणी चौकीचे पोलीस नाईक राठोड हे वाळू वाहतूकीचे वाहने तपासणी करत होते . या कारवाईची माहीती मिळताच पत्रकार घटनास्थळी पोहचले . मात्र , पथकातील डिवायएसपीचे राईटर रवी चव्हाण यांनी फोटो काढणाऱ्या पत्रकाराना मज्जाव करत दमदाटी करून माहिती देण्याचे टाळले . पत्रकाराजवळील मोबाईल हिसकाहुन घेण्याचा प्रयत्न करताच स्थानिक ग्रामस्थ पोलीसांवर आक्रमक होते . ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून वाहनधारकाजवळ रॉयल्टी नसणे , कमी रॉयल्टी जास्त ब्रास वाळू असे प्रकार निदर्शनात येऊनही कोणतीच कारवाई न करताच घटनास्थळावरून पळ काढल्याने हे पथक अधिकृत होते की अनाधिकृत ? कारवाईची दखल घेण्याऱ्या पत्रकारांना मज्जाव का केला ? कारवाई न करता वाहने का सोडली ? पथकातील कर्मचाऱ्यानी नावे न सागंता माहीती देण्याचे का टाळले ? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. खाजगी गाडीच्या वापर ... डिवायएसपीचे राईटरने खाजगी गाडीच्या वापर का केला असून वाळु वाहतुकीचे वाहने तपासणी करुन कारवाई न करता केवळ वाहने सोडुन दिल्याचे समोर आले आहे . या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना सकाळी १० वा . संपर्क केला असता , मोबाईल उचला नाही .मी मिटींगमध्ये आहे . कॉल करतो . असा मेसेज केला . सांयकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क केला . मात्र होऊ शकला नाही . रात्री ६ : ३० वा . बोलणे झाले असता राईटर रवी चव्हाण यांची बाजू घेत कारवाई दरम्याण फोटो काढण्याचा तूम्हाला काय अधिकार आहे . गोपणीयतेच भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. असा दम दिला. यावर पत्रकारानी तुम्हाला कोणी रोखले गुन्हा दाखल करा . असे म्हटल्यावर मी चौकशी करतो . असे वाळके म्हणाले . याबाबत तळणी चौकीचे पोलीस नाईक नामदेव राठोड यांनी हे पथक डिवायएसपीचे असल्याचे सांगत हा विषय इथेच संपवू द्या . अशी विनती केल्याने या पथकाला तळणी पोलीसांचे सहकार्य असल्याचे दिसून आले .

Comments