प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 78 अर्ज


मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,गर्भवती महिलांसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावनिस मुर्हत लागला असून तालुक्यातील तीन प्राथमिक केंद्रअंतर्गत लाभर्ती महिलेची माहिती संकलित केलि जात आहे.या अंतर्गत 31 जानेवारीपर्यंत 78 लाभर्त्यांचे अर्ज ऑनलाइन भरले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी, प्रदीप कामळे,दत्ता सरकटे सर यांनी दिली.माता व बाल मृत्यु रोखण्यासाठी केंद्र शासनाने 1 जानेवारी 2017 पासुन प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली.ग्रामीण भागात
प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यातरीही अनेक वेळा घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त आहे.अशा प्रसुति वेळी विद्यकीय सुवेधीअभावी मातेसह नवजात अर्भकाच्या जीविताही धोका निर्माण होत.असतो त्यामुळे माता व बाल मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने ही योजन सुरु केली.या योजने अंतर्गत पहिल्या बळांपनात तीन टप्प्यात मातेला आर्थिक मदत दिली जाणार आहे.सर्वच प्रवगातिल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.परंतु हा लाभ पहिल्याच प्रसुतिच्या वेळी देण्यात येणार आहे.शासकीय निमशासकीय कार्यलयतील नोकरदार महिला,आंगनवाडी सेविका,मदतनिस आशा कार्यकार्ति यांनाही यांच्या फायदा मिडनार आहे.1 जानेवारी 2017 पासून या योजनेचा लाभ दिला जाणार असून गर्भवती महिला कडून तिन प्रकारचे अर्ज भरून घेतले जात आहेत.माता व बालकांचे आरोग्य व लसिकरन हा या योजनेचा मुख्य उद्देश् आहे.या मुळे या लाभर्तीयांना थेट अनुदान मिळनार असल्याने आहाराकडेही लक्ष राहणार आहे.तालुक्यातील मंठा,पाड़ोदा,ढोसकाळ,दहिफल खंदारे या ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातुन जानेवारी आखिर  78  फॉर्म ऑनलाइन करण्यात आले आहे.

Comments